
साहेब आमचे काय चुकले ? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्र मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. इंदापूरच्या भविष्यासाठी पक्ष बदलला, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. तसे त्यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट व स्टेटस ठेवत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खालील प्रकारे पोस्ट व स्टेटस सोशल मीडियामध्ये व्हायरल केले आहेत.
आदरणीय साहेब,
आमचे काय चुकले ? लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्व बडे नेते एका बाजूला असताना आम्ही आपल्याकडे पाहून ताईंच्या पाठीमागे उभे राहिलो.
ज्या हर्षवर्धन पाटलांना विरोध म्हणून आम्ही ताईंना मतदान केले त्या इंदापूर तालुक्यावर अन्याय करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना आपण पक्षांमध्ये घेत आहात.
आम्हाला हे मान्य नाही !
एक निष्ठावंत कार्यकर्ता |
अशा प्रकारचे स्टेटस व पोस्ट कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्या जात आहेत.