
पुणे: भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींसाठी सात दिवसीय “शुभारंभ” स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक मा. श्री. दशरथ पाटील, तसेच दमिनी पथकाच्या मा. श्रीमती दीक्षा मोरे आणि मा. निलीमा जाधव* यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना सशक्त होण्याचे आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या बीजभाषणात विद्यार्थिनींना सांगितले की, “ज्ञान मिळवणे म्हणजेच तुमच्या स्वप्नांना आकार देणे.” त्यांच्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण झाली. त्यांनी विद्यार्थिनींना आगामी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि सतत प्रगतीच्या मार्गावर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रथम वर्षाच्या गुणवान विद्यार्थिनींचा तसेच नोकरी मिळवलेल्या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. या विशेष सन्मानामुळे विद्यार्थिनींच्या मनात नवीन जोश आणि आत्मविश्वास निर्माण झाला ज्यामुळे त्यांनी आपल्या भविष्याची तयारी करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे आणि सर्व विभाग प्रमुखांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपाली गोडसे यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या ई-न्यूजलेटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शुभारंभ’ स्टुडंट इंडक्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. दीक्षा चोपडे यांनी विशेष भूमिका निभावली. या कार्यक्रमाचे संचालन कु. नंदिनी पांडे, कु. अमेया निमकर, कु. प्रेरणा भोकरे आणि कु. अनामिका शर्मा यांनी केले. तसेच, प्रथम वर्षाच्या शिक्षकांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रे
या ७ दिवसीय इंडक्शन कार्यक्रमात विद्यार्थिनींना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा पुढील प्रवास सुकर करण्यासाठी विविध तज्ञांच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. कबीर गायकवाड यांनी “इंजिनिअरिंगमधील नीतिमत्ता आणि व्यावसायिकता,” प्रा. विक्रमसिंह मगर यांनी “युवक सक्षमीकरण,” डॉ. अतुल आयरे यांनी “महिला अभियंत्यांचे सक्षमीकरण,” प्रा. राजेंद्र उत्तूरकर यांनी “एबीसी ऑफ हॅपिनेस,” प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव आणि श्री. तनमय सालके यांनी “स्टार्टअप आणि उद्योजकता विकास” या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. महारुद्र कापसे यांनी “व्यावसायिकांसाठी सकारात्मक देहबोली,” श्रीमती पुष्पा दरेकर यांनी “कॅटलिस्ट स्कॉलरशिप,” प्रा. प्रणोती काले यांनी “ट्रेनिंग आणि प्लेसमेंट,” तसेच श्री प्रशांत गायकवाड, श्री धनंजय कुलकर्णी आणि श्री महेंद्र चोरगे यांनी “हॅपी थॉट्स सेमिनार,” आणि डॉ. गौरी पाटील यांनी “अभियंत्यांसाठी खेळाचे महत्त्व” या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या सत्रांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचे ज्ञान, कौशल्ये, आणि प्रेरणा दिली, ज्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला.