
दै चालु वार्ता
पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
खेड आळंदी विधानसभा निवडणूक 2024 याकरिता राजगुरुनगर ( खेड) तालुक्याचे आदर्श समाजसेवक अमर भाऊ बो-हाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज खेडचे प्रांत अधिकारी , तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दैंडे यांच्याकडे( दि. 22 रोजी) दाखल केला. समाजसेवक अमर बोऱ्हाडे यांनी यापूर्वी आमदारकी, खासदारकी, तसेच पंचायत समितीची निवडणूक लढवली होती . यामध्ये अंध, अपंग, मूकबधिर, विधवा महिला, संजय गांधी निराधार योजनेतून, अनेकांना लाभ मिळवून दिला. सामाजिक हितासह गरजवंत नागरिकांना रेशन कार्ड काढून देणे,तसेच खेड तालुक्यात पुर्ण वेळ समाज हिताची, लोकहिताची, कामे करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. चर्मकार समाजातील हे उमदे नेतृत्व समाज हितासाठी अहोरात्र झटत असताना दिसत आहेत.
जागृत मतदार बांधवांनी अशा तरुण तडफदार उमेदवारास किमान एकदा तरी संधी द्यावी असे खेड तालुक्यातील मतदारांमध्ये बोलले जात आहे.