दै. चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :
भारतीय जनता पार्टी भोकर च्या शहर उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ता श्रीपाद पटवेकर यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र देताना श्रीजयाताई अशोकराव चव्हाण
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने तसेच आपला पक्ष कसा बळकट करता येईल जी रिक्त पदे आहेत ती कार्यकर्त्यांना देत आपल्या पक्ष वाढीसाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जात असताना, वाल्मीक नगर, भोकर येथील युवा कार्यकर्ता श्रीपाद त्रिंबकराव पटवेकर यांच्या कार्याची दखल घेत भोकर विधानसभा प्रमुख तथा भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या उमेदवार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण व शहराध्यक्ष विशाल माने यांच्या हस्ते शहर उपाध्यक्षपदी निवड केल्याबाबद निवडीचे पत्र देण्यात आले.
निवडीनंतर पक्षामध्ये संघटनात्मक कामे करत असताना पक्षाशी एकनिष्ठ राहून शहरातील पक्ष संघटन वाढीसाठी योग्य ते प्रयत्न करीन असे ते म्हणाले. यांची निवड झाल्याने त्यांना भाजपा तालूका अध्यक्ष गणेशराव कापसे, युवा मोर्चा अध्यक्ष वेणू कोंडलवार , डॉ. किरण पांचाळ, बालाजी घिसेवाड , व्यंकट घिसेवाड , पत्रकार विजयकुमार चिंतावार, गोविंद फुजुलवाड, अनिल बेरदेवाड, गणेश गोलेवाड, अनील होळकर, विकास मुदिराज यांनी शुभेच्छा दिल्या.