
मुंबई इंडियन्सन ४५ कोटी रक्कम खिशात घेऊन मेगा ऑक्शनसाठी आले होते. पण, त्यांनी पाच-सहा तास एकाही खेळाडूला ताफ्यात घेतले नाही. इशान किशनच्या नावाची ते वाट पाहतात, असे वाटले होते.
पण, त्यालाही त्यांनी जाऊ दिले. जोफ्रा आर्चर यालाही त्यांना आपल्या ताफ्यात घेता नाही आहे. रात्री ११.१५ वाजेपर्यंत मुंबई इंडियन्सने एक कॅप्ड व तीन अनकॅप्ड खेळाडूंना करारबद्ध केले. त्यात त्यांनी RTM Card हाताशी असूनही एका महत्त्वाच्या खेळाडूला ताफ्यात न घेतल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. ही चूक त्यांना आयपीएल २०२५ मध्ये महागात पडू शकते.
पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला मागील पर्वात काही खास कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा त्यांचा डाव फसला. पण, आयपीएल २०२५ मध्ये ते हार्दिकच्याच पाठिशी खंबीर उभे आहेत. त्यांनी रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले आहे. MI ने जसप्रीत बुमराहला सर्वाधिक रक्कम दिली आहे, त्यानंतर सूर्या, हार्दिक, रोहित आणि तिलक वर्मा यांना संघात कायम राखले आहे.
मुंबई इंडियन्सने लिलावात ट्रेंट बोल्टसाठी सर्वाधिक १२.५० कोटी रक्कम मोजली. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह व बोल्ट ही जोडी धुमाकूळ गाजवताना दिसेल. नमन धीरला ५.२५ कोटींत मुंबई इंडियन्सने RTM Card वापरून आपल्या संघात ठेवले. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी बोली लावली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सने रॉबिन मिंझ ( ६५ लाख) व कर्ण शर्मा ( ५० लाख) यांना करारबद्ध केले.
नेहाल वढेराला जाऊ दिले…
चेन्नई सुपर किंग्स व पंजाब किंग्स यांनी नेहाल वढेरासाठी बोली लावली. CSK १.४० कोटींची बोली लावताच लखनौ सुपर जायंट्स आले, परंतु त्यांनी लगेच बॅक आऊट केले. CSK vs PBKS अशीच स्पर्धा रंगली होती. २.८० कोटींची किंमत लागताच गुजरात टायटन्सने बोली वाढवली. दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी बोली लावली, पंरुत पंजाब किंग्सने ४.२० कोटींत वढेराला आपल्या संघात घेतले. MI ला RTM करणार का विचारले गेले आणि त्यांनी नकार दिला.
वढेरा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि त्याने २० सामन्यांत १४० च्या स्ट्राईक रेटने ३५० धावा कुटल्या आहेत. त्याने अनेकदा काही महत्त्वाच्या खेळीही केल्या आहेत. त्यामुळे MI ने त्याला जाऊ देण्याचा निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले.