
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दास यांना आरोग्याची किरकोळ समस्या (ॲसिडिटीची तक्रार) होती. काळजी करण्याची गरज नसल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या प्रकृतीबाबत रिझर्व्ह बँकेनेही एक निवेदन जारी केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, दास यांनी ॲसिडिटीची तक्रार केल्यानंतर त्यांना तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, काळजी करण्यासारखे काही नाही आणि काही तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.
शक्तीकांत दास हे RBI चे 25वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. ते यापूर्वी पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य होते आणि G20 मध्ये भारताचे शेर्पा होते. शक्तिकांत दास हे तामिळनाडू केडरच्या 1980 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) निवृत्त अधिकारी आहेत.
आयएएस अधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीत, दास यांनी भारत आणि तामिळनाडू सरकारसाठी आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव यासह विविध पदांवर काम केले. त्यांनी जागतिक बँक, ADB, NDB आणि AIIB येथे भारताचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे.