
दै चालु वार्ता प्रतिनिधी
आळंदी/पिंपरी
बद्रीनारायण घुगे
आळंदी : दि.२६ ते २८ रोजी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत हरिनाम सप्ताहाचे विविध ठिकाणी मंडप विविध धर्मशाळेत ज्ञानेश्वरी पारायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा दरम्यान साजरे होणारे ७२८ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव अनुषंगाने आज (दि.२६) रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.
सदर भेटी दरम्यान कार्तिकीवारी निमित्त लावण्यात आलेल्या बंदोबस्ताची पाहाणी करुन अधिकारी व अमंलदार यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच माऊली मंदिर व्यवस्थापनाचे विश्वस्त मंडळाशी चर्चा केली. वाहतुक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर तसेच गुन्हेगारी नियंत्रणा करीता आवश्यक उपाययोजना, बंदोदस्ता बाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, बापु बांगर, पोलीस उप आयुक्त, (वाहतूक शाखा), राजेंद्रसिंग गौर, सहा. आयुक्त (चाकण विभाग), बाळासाहेब कोपनर, (गुन्हे-२), भिमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशन, बापु ढेरे, तसेच राजेंद्र उमाप, श्री. क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त, योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, विश्वस्त, भावार्थ देखणे विश्वस्त, पोलीस अधिकारी व गुप्तवार्ता डी बी क्राईम ब्रांच २तुकडी राखीव पोलीस दल अमंलदार उपस्थित होते. आळंदी नगरपरिषद कर्मचारी तसेच आळंदी पोलीस स्टेशन खेडकर यांनी मंदीरात चांगला चोख बंदोबस्त ठेवला आहे