
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदावरून गोंधळ निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे.
भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद यापैकी एक पर्याय देत विचार करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली आहे. दरम्यान, शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
नरेंद्र मोदी यांना मी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं. माझ्यामुळे कधीही सरकार बनवण्यासाठी अडचण येणार नाही. मी काहीही ताणून ठेवलं नाही, अमित शाह यांच्यासोबत देखील माझं बोलणं झालं. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. महायुती मजबूत आहे. मुख्यमंत्री बनवण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. शिवसेनेचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. आणखीन गतिमान निर्णय घ्यायचे आहे, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, हा मोठा विजय पहायला मिळाला. जे काही अडीच वर्षात महायुतीने काम केल आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. एकीकडे विकास काम आणि मविआने थांबवलेली काम होती. दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. मी कधीच स्वत:ला मुख्यमंत्री म्हणून समजलं नाही. मी एक कॉमन मॅन होते. त्यामुळे मला लोकांमध्ये जाता येत होते.
महायुतीच्या सर्वांनी निवडणुकीत प्रंचड काम केल. मी पहाटेपर्यंत काम करायचो. पुन्हा माझी सभा असायची. हे सत्र पूर्ण निवडणुकीपर्यंत चाललं. ९०-१०० सभा घेतल्या. पायाला भिंगरी लावून मी साध्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केल. मी स्वत:ला एक मुख्यमंत्री कधीच समजलो नाही. एक सामान्य माणूस म्हणून मी काम केल. सर्वसामान्य जनतेसाठी आपण काही तरी केल पाहिजे, असं शिंदे म्हणाले.
मोदींना धन्यवाद –
मी पण एका शेतकरी कुटुंबातून आलोय. मी भाषणात पण माझे विषय मांडले. ज्या दिवशी असा अधिकार माझ्याकडे येईल तेव्हा मी सामान्य लोकांसाठी काम करेल. काहीना काही केल पाहिजे अशी भावना नेहमीच माझ्या मनात होती. श्रीमंत माणूस किंवा सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना कस कळणार. त्यातून जाव लागत आणि म्हणून मी तेच केल. सर्व घटकांसाठी इको सिस्टम तयार झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्वांना काहीना काही देण्याचा प्रयत्न केला. सरकारचं काम काय असत. सामान्य माणसाला सरकारकडून आधार मिळाला पाहिजे. मी खूप खूष आहे मला समाधान आहे. तसेच मोदींचं व अमित शाह यांच पूर्ण पाठबळ आम्हांला होतं. त्यांचे देखील धन्यवाद. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांवर त्यांनी विश्वास ठेवला.
मी खूप समाधानी-
अडीच वर्षात केलेल्या कामामुळे मी खूप समाधानी आहे. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक होते. कोणत्याही सरकारने असे निर्णय घेतले नाही. मविआच्या काळात अनेक प्रश्न थांबले होते. सिंचनाचे प्रकल्प थांबले होते. आम्ही अनेक प्रकल्प सुरू केले. राज्याचा प्रगतीचा वेग वाढला. राज्य एक नंबरला नेण्याचं काम आम्ही केल. या निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला कारण आम्ही तसं काम केलं होतं. लाडका बहिणीचा सख्खा लाडका भाऊ ही माझी ओळख निर्माण झाली, लाडक्या भावाची ओळख ही सर्व पदापेक्षा मला मोठी आहे, असे शिंदे म्हणाले.