
जयंती मंडळाने सर्व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन
दैनीक चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड – रामायण रचीता आद्यकवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची भव्य जयंती उत्सव सोहळा भोकर शहरात दि. ८ डिसेंबर रविवार रोजी करण्यात येणार असून या जयंती सोहळ्यास ग्रामीण भागातील व शहरातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महर्षी वाल्मीक ऋषी सार्वजनीक जयंती सोहळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
रामायण रचीता महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती दरवर्षीच मोठ्या उत्साहात भोकर शहरात साजरी केली जाते त्याप्रमाणे याही वर्षी सर्व समाज बांधव व जयंती मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून या जयंती सोहळ्यास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकराव चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार मा. श्रीजयाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर समाज नेते नागनाथराव घिसेवाड व व्यंकट मुदीराज यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरील कार्यक्रम हे भोकरचे ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिर च्या बाजूस रामायण रचिता आद्यकवी वाल्मीक ऋषी यांचे मंदिर असून तेथे सकाळी ९ वाजता विधीवत पूजा आरती करून सकाळी १० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर दुपारी १ वाजता भव्य अशी मिरवणूक वाजत – गाजत निघणार आहे. सदरील मिरवणूक ही महादेव मंदिर, वाल्मीक ऋषी यांचे मंदिरापासून सुरुवात होऊन महात्मा फुले नगर मार्गे बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बालाजी मंदिर नवा मोंढा ते किनवट रोड, सराफा लाईन, गांधी चौक मार्गे येऊन मिरवणूक सुरुवात झालेल्या वाल्मीक ऋषी मंदिर येथे येऊन समारोप केल्या जाणार आहे. तरी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील व भोकर शहरातील सर्व समाज बांधवांनी सदरील कार्यक्रमात व मिरवणूकीत सहभागी होऊन सदरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महर्षी वाल्मीक ऋषी सार्वजनीक जयंती सोहळ्याच्या वतीने करण्यात आले आहे.