
डॉ.आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मंत्र्याची टीका..
“डॉ. आंबेडकर आणि बसवाण्णांची तत्त्वे जसजशी वाढत जातील, तसतशी आरएसएसची विचारधारा कमी होत जाईल.”
बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी शनिवारी ‘त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावले आहे’, असे त्यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गुलबर्गा येथे पत्रकारांशी बोलताना ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री म्हणाले की, शहा यांच्या विचारात डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) नाहीत. सामाजिक समता नाही. डॉ. आंबेडकर आणि बसवाण्णांची तत्त्वे जसजशी वाढत जातील, तसतशी आरएसएसची विचारधारा कमी होत जाईल. दरम्यान, आमदार रवी यांची न्यायालयाने सुटका केली. हा सत्याचा विजय आणि काँग्रेससाठी नामुष्की आहे, असे भाजपने म्हटले आहे.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खर्गे म्हणाले की, बदनामी काय होणार? एफएसएल अहवाल येऊ द्या. मग पाहू. कायदा फक्त भाजपलाच माहीत नाही, तर आम्हालाही माहीत आहे, असा पलटवार त्यांनी केला.