
मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांना स्थान न देण्यात आल्याने नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. भुजबळांच्या नाराजी नाट्यात ते भाजपात प्रवेश करू शकतात अशीही चर्चा होती.
मात्र, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, भुजबळांना तुर्तास तरी भाजपमध्ये घेतलं जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत वाद नको म्हणून भुजबळांना भाजपात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील अनेक नेते नाराज झाले असून, यात वरिष्ठ नेते असलेल्या भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यानंतर नाराज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली होती. पत्ता कट करण्यात आलेल्या नेत्यांचं पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी एकीकडे होत आहे. एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओखळ असून, भुजबळांना जर भाजपमध्ये घेतलं तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो. त्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. हे वाद टाळण्यासाठी तुर्तास तरी भुजबळांना भाजपमध्ये तुर्तास तरी प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
भुजबळ राज्यसभेवर तर, मुनगंटीवारांना प्रदेधाध्यपद?
मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर आहे. त्यात भुजबळांनी तर त्यांची नाराजी थेट उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यानंतर या नेत्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली जात असून, या आठवड्यात महायुतीच्या बड्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत भुजबळांना राज्यसभेवर तर, सुधीर मुनगंटीवार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद दिले जाण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो”, काँग्रेस नेत्याचा दावा
निश्चित चांगला मार्ग काढू; फडणवीसांचा भुजबळांना शब्द
मध्यंतरी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास खलबतं झाली होती. त्यानंतर फडणवीसांनी महायुतीला जो विजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळं लाभलं. त्यांचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आभार मानले पाहिजे. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मला आहे. त्यांचे नुकसानही होऊ देणार नसल्याचे सांगितले होते. तसेच आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू. राज्यातील ओबीसी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही निरोप द्या की मी यावर विचार करतोय. शांततेनं घ्या. दहा बारा दिवसांत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले होते.