
पोलीस स्टेशनजवळ फेकली बाॅडी
प्रेमात मर्यादा ओलांडणे ही मोठी गोष्ट नाही, पण क्रूरतेच्या मर्यादा ओलांडणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. तेही विवाहाबाहेर चाललेल्या अवैध प्रेमसंबंधांबाबत. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात अशीच एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
येथे एका पत्नीने आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषावर इतके प्रेम केले की, तिने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. तिने केवळ आपल्या प्रियकराकडून पतीची हत्याच केली नाही, तर त्याचे नाक आणि मानही कापली. त्यानंतर निर्भयपणे तिने मृतदेह नग्न करून पोलीस स्टेशनजवळ फेकून दिला.
पोलिसांनी उलगडली हत्येची रहस्यमय कहाणी
थानागाजी पोलिसांनी 9 जानेवारी रोजी पोलीस स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाची केस उलगडली आहे. या मृतदेहाचे नाक आणि मान कापलेले होते. मृताची ओळख मालखेडा येथील महुआ कला गावचा रहिवासी रामपाल मीना म्हणून झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासले असता, बरीच महत्त्वाची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रामलालची पत्नी छोटी देवीची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने क्रूर कहाणी सांगितली.
चार ते पाच वर्षांपासून अनैतिक संबंध
पोलिसांनी सांगितले की, छोटी देवीचे थानागाजी येथील सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे चार ते पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. छोटी देवी मजुरीचे काम करत असे. मजुरी करतानाच तिची सुभाषशी भेट झाली. त्यानंतर दोघांचे प्रेम जुळले. छोटी देवी आणि सुभाष रेवाडीच्या बावल परिसरात पती-पत्नीप्रमाणे राहत होते. छोटी देवीचा पती रामपाल आणि तिच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली.
नग्न अवस्थेत मृतदेह पोलीस स्टेशनजवळ फेकला
रामपालने छोटी देवीला टोमणे मारणे सुरू केले. त्याने तिला बाहेर जाण्यास मज्जाव करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत, त्रस्त छोटी देवीने प्रियकर सुभाषसोबत मिळून पती रामपालला मारण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी प्रथम रामपालला दारू पाजली. मग तो बेशुद्ध झाल्यावर त्यांनी त्याचे अकबरपूर गावातून अपहरण केले आणि थानागाजी येथे आणले. येथे त्याला एका हॉटेलच्या टॉप फ्लोअरवरील एका खोलीत चार दिवस ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर सुभाषने हॉटेलमधून एक मोठा चाकू घेतला आणि रामपालचा गळा चिरून त्याची हत्या केली. त्याने त्याचे नाकही कापले. सुभाष आणि छोटी देवीने रामपालला नग्न करून त्याचा मृतदेह पोलीस स्टेशनजवळ फेकून दिला.