
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सहा हप्ते जमा झाले आहेत.जानेवारी महिन्यात सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. संक्रातीच्या मुहूर्तावर हा हप्ता जमा होणार,अशी चर्चा होती.
यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार होती. मात्र महिलांच्या खात्यात अद्याप पैसेच आले नाहीयेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात कडू झाली आहे.त्याचसोबत आता 1500 रूपयांसाठी आणखीण किती दिवस वाट पाहावी लागणार? असा प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित होतं आहे.
लाडक्या बहिणींना 1500 रूपयांचा हप्ता देण्यासाठी सरकार संक्रातीचा मुहू्र्त साधणार असल्याची चर्चा होती. मात्र संक्रात होऊन दोन दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीयेत. त्यात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक होणार आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्ता देण्याचे निर्णय होतात. पण आजच्या बैठकीत जानेवारीचा हप्ता देण्याबाबत अद्याप कुठलाच निर्णय घेतला गेला नाही.त्यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यांसाठी वाट पाहावी लागणार आहे.
जानेवारी अर्धा महिना आता उलटला आहे. सरकारच्या हातात शेवटचे 14 उरले आहेत. त्यामुळे आता इतक्या दिवसात सरकार कधी निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यात डिसेंबरचा हप्ता महिलांना उशिराने मिळाला होता. त्यामुळे डिसेंबरप्रमाणेच जानेवारीचा हप्ता महिलांना उशिरा मिळणार आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे.
महिलांच्या अर्जाची छाननी सूरू
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत, ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे. त्या या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसला आहे.