
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्र्यांवर आरोप केला होता. मंत्रालयात लॅम्बोर्गिनी गाडी कोणाकडे आली होती?
आमदार रोहित पवार यांच्या आरोप नंतर महसूल मंत्री डॉ विखे पाटील चर्चेत आले होते. मंत्रालयात लॅम्बोर्गिनी कार आली होती. या कारची कोणीही तपासणी केली नाही. ती थेट मंत्रालयाच्या पोर्चमध्ये गेली. या कारमधून मोठा बांधकाम व्यवसायिक कोणत्या मजल्यावर गेला आणि त्याचे काय काम होते? असे सूचक प्रश्न आमदार पवार यांनी केले होते.
त्यामुळे संबंधित बांधकाम व्यवसायिक मंत्रालयात महसूल मंत्री यांना भेटल्याची चर्चा सुरू झाली होती. ही भेट कशासाठी झाली? याबाबत विविध शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्याला आता माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, आमदार पवार यांच्या आरोपानुसार लॅम्बोर्गिनी गाडी माझ्याकडे आली होती, अशी चर्चा झाली. मात्र माझ्या आजपर्यंतच्या जीवनात असे कधीही झाले नाही. त्यामुळे माहिती घेऊन आमदार पवार बोलले असते, तर बरे झाले असते.
मंत्रालयात अनेक गाड्या येतात. त्यामुळे अमुक गाडी माझ्याकडेच आली, हे कसे? सांगता येईल. या संदर्भात आधी चौकशी करायला हवी होती. त्या गाडीला काळ्या काचा होत्या, असे आमदार पवार म्हणत होते. काचा खाली करून बघायला पाहिजे होत्या. कदाचित काचा खाली केल्या असत्या तर गाडीत आमदार रोहित पवार हेच दिसले असते, असा टोमणा विखे पाटील यांनी मारला.
गेला आठवड्यात आमदार पवार यांनी संबंधित लॅम्बोर्गिनी गाडीबद्दल आरोप केला होता. या आरोपामुळे खळबळ उडाली होती. माध्यमांमध्ये त्याची बरीच चर्चा झाली. ही गाडी महसूल मंत्र्यांकडे गेली होती असाही दावा केला जात होता.
या प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकारणावर आज मंत्री विखे पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. आता हा चेंडू पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांच्याकडे भिरकावला गेला आहे. आमदार रोहित पवार त्याला काय उत्तर देतात याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.