
भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?
पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना (Ajit Pawar) सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे.
धनंजय मुंडेंच्या या गौप्यस्फोटानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केला आहे. षड्यंत्र होतं तर कुणी रचलं असा प्रश्न उपस्थित केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, मी भाषण ऐकलं. षड्यंत्र होतं तर कुणी रचलं? उद्धव ठाकरे, काँग्रेसने रचलं नसेल. राष्ट्रवादी किंवा भाजपच्या लोकांनी रचल का? काँग्रेस आणि पवार साहेब यांच्यात वाद झाला होता. पवार साहेब निघून गेले. अजित दादा एका मिटिंगला नव्हते नंतर अजितदादा टीव्हीवर दिसले. मी पवार साहेबांकडे गेलो होतो. कामाला लागू सांगितलं. आम्हाला काही कल्पना नव्हती. इकडे तिकडे गेलेले आमदार शोधायला सुरुवात केली. मी स्वतः अजित दादांकडे गेलो होतो असं करू नका म्हणून, पवार साहेबांकडे या असं मी सांगितले. आमच्या पक्षाची जी मिटिंग झाली त्यात मी स्वतः ठराव मांडला .चूक झाली असेल तर जाऊद्या सांगितले. उपमुख्यमंत्री करा हे सुद्धा मी सांगितले . माझ्याबद्दल काही लोकांना राग सुद्धा आला. काल त्यांनी सांगितले त्याचा रोख कुणाकडे होता हे त्यांना माहिती आहे.
पालकमंत्रिपद स्थगितीवर काय म्हणाले भुजबळ?
नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपद स्थगितीवर बोलताना भुजबळ म्हणाले, मी मंत्री नाही
काय चाललंय, कोण काय मागतं माहिती नाही .सगळ्यांनाच मिळेल असे नाही. अडचण आली असेल म्हणून स्टे दिला असेल. मुख्यमंत्री उद्योगपतींच्या कार्यक्रमाला गेले आहे नंतर ते आल्यावर चर्चा करून मार्ग काढतील.
काय घरपोच डिझेल उपक्रम?
घरपोच डिझेलवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, भारत सरकारचा स्टार्टअप इंडिया संकल्प आहे. त्यातील हा एक उपक्रम आहे.घरपोच डिझेल पोहचवणे, दोन मित्रांनी हे सुरू केले. त्यांनी टँकर घेतला, भारत सरकारने सबसिडी दिली. मोठमोठ्या ठिकाणी कामे सुरू आहे यांना फोन आला की डिझेल मिळेल. जशी जेवणाची ऑर्डर देतात आणि जेवण मिळते तशी ही योजना आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुद्धा करता येणार आहे. पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. ताबडतोब सेवा मिळणार आहे त्यांनी मोबाईल नंबर दिला आहे. जाहिरात करा म्हणून त्यांनी सांगितले आहे. वेळ वाचणार आहे, पाहिजे त्या वेळेला मिळणार आहे . केंद्राच्या योजनेचा त्यांनी फायदा घेतला.