
क्रिती सेननला भाड्याने दिलेला ड्युप्लेक्स इतक्या कोटींना विकला
बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा येथे असलेले त्यांचे डुप्लेक्स अपार्टमेंट कोटी रुपयांना विकले आहे. बच्चन यांनी डुप्लेक्सची विक्री केल्याचे मालमत्ता नोंदणी कागदपत्रांतील नोंदीतून समोर आले आहे.
हा ड्युप्लेक्स ‘अटलांटिस’ या क्रिस्टल ग्रुपच्या प्रकल्पामध्ये असून जो 1.55 एकरांवर विस्तारलेला आहे.
असा आहे बच्चन यांचा ड्युप्लेक्स
या आलिशान ड्युप्लेक्सचा एकूण बिल्ट-अप एरिया 5,29.94 चौ.मी. असून कार्पेट एरिया 5,185.62 चौ.फूट इतका आहे. याशिवाय 445.93 चौ.मी. आकाराचा प्रशस्त टेरेसदेखील आहे. या ड्युप्लेक्ससोबत सहा पार्किंग स्लॉट्सचा समावेश आहे. या व्यवहारासाठी 4.98 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क भरले गेले.
क्रिती सॅनन भाड्याने दिला होता
नोव्हेंबर 2010 मध्ये बच्चन यांनी हा ड्युप्लेक्स अभिनेत्री क्रिती सॅननला दरमहा 10 लाख रुपये भाड्याने दिला होता. त्यासाठी 60 लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिटदेखील घेतले गेले होते, असे IGR दस्तऐवजांतून समोर आले आहे.ओशिवरा हा मुंबईच्या पश्चिम भागातील गजबजलेला परिसर असून लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळील उत्तम लोकेशनसाठी प्रसिद्ध आहे.
2021 मध्ये बच्चन यांनी हा ड्युप्लेक्स 31 कोटी रुपयांना खरेदी केला होता. केवळ चार वर्षांत या मालमत्तेची किंमत तब्बल 168% ने वाढली. 2025 च्या जानेवारीत हा व्यवहार झाला आहे. बिग बींनी हा ड्युप्लेक्स तब्बल 83 कोटींना विकला आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बॉलीवूडचे सुपर स्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’, ‘दीवार’, आणि ‘पिकू’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिका अजरामर केल्या आहेत. त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारखे पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.