दैनिक चालू वार्ता
उमरगा धाराशिव प्रतिनिधी मनोजकुमार गुरव
तालुक्यातील कंटेकूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन उत्साहात पार पडली. तीन दिवसाच्या या सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांचा अभ्याससह प्रेक्षणीय स्थळांवर सहलीचा आनंद लुटला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोनामुळे शालेय सहली बंद होत्या. आता कोरोनाचे संकट दूर झाल्याने शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विकास व्हावा त्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणासोबतच अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. ही सहल वाई, प्रतापगड, महाबळेश्वर, रायगड, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, नारायणपूर बालाजी व जेजुरी येथे पार पडली. या सहलीत कंटेकूर शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. यावेळी इयत्ता 4 थी ते 8 वी वर्गातील एकूण 45 मुले आणि मुली सहभागी झाल्या होत्या. या संपूर्ण सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी खूपच धमाल केली व शिवरायांचा ऐतिहासिक ठिकाणाची माहिती घेतली. मुख्याध्यापक नागेंद्र समन यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेतील शिक्षकांसह सहल प्रमुख लक्ष्मीकांत पटणे, शिवकुमार स्वामी, लतीफ लदाफ, लक्ष्मण येवते व रुक्मिणी जमादार उपस्थित होते.
