
शिंदे गट निधीवाटपात तिसऱ्या स्थानी…
अजित पवारांनी भाजपच्या मंत्र्यांसाठी हात सैल सोडला आहे का? असा सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्याच्या विभागाला अधिक निधी देण्यात आला आहे.
या उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या विभागांना तुलनेनं कमी निधी देण्यात आल्याचे बघायला मिळत आहे.
निधी वाटपात असमतोल, शिंदे गट निधीवाटपात तिसऱ्या स्थानी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल (10 मार्च) सोमवारी विधिमंडळात राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या 11वा अर्थसंकल्पात अजित पवारांकडून अनेक योजनांची घोषणा करत सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वच महापुरुषांना वंदन करुन महाराष्ट्र सरकारचा यंदाचा 2025-26 अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली. यावेळी मी माझ्या आयुष्यातील 11वा अर्थसंकल्प सादर करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलंय.
मात्र महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठोपाठ आता अजित पवार यांचा कडूनही शह देण्यात येत असल्याच्या चर्चा आहे. कारणं नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्याच्या विभागाला अधिक निधी देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट मात्र तिसऱ्या नंबरवर असल्याचे पुढे आले आहे. शिंदे गटाचे 57 तर अजित पवार गटाचे 41 आमदार सध्या सत्तेत आहेत. परिणामी विभागवार निधी वाटपात समतोल नसल्याने येत्या काळात धुसफूस वाढण्याची चिन्हे अधिक बाळवली असल्याचे ही बोलले जात आहे.
अजित पवार गट दुसऱ्या, तर शिंदे गट तिसऱ्या नंबरवर
- शिंदे गटाचे 57 तर अजित पवार गटाचे 41
भाजप – ८९ हजार १२८ कोटी
राष्ट्रवादी – ५६ हजार ५६३ कोटी
शिवसेना – ४१ हजार ६०६ कोटी