
धनंजय मुंडे आणि कराडबद्दलचा FIR व्हायरल…
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह त्याची गँग पोलिसांच्या कोठडीत आहे. पण या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
पण, अशातच आता धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे सोबत गुन्हेगारी करायचे? याबद्दलचा एक पुरावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमधील २००७ मधील प्रकरणातील एफआयआरमध्ये दोघांचीही नाव एकत्र असल्याचं दिसतं आहे. पण, या प्रकरणातून पुढे धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं असल्याची माहितीही समोर आली. पण हा FIR मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
बीड जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर एक जुना १८ एप्रिल २००७ चा FIR व्हायरल झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या FIR सोबत एक मॅसेज देखील व्हायरल होत आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं म्हटलं जात आहे. पुढे सन 2007 मध्ये किशोर फड याला जिवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत, असंही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.
तर,माझा आणि वाल्मिक कराडचा संबंध नाही’ असं म्हणणारे धनंजय मुंडे यांचं नाव या एफआयआरमध्ये कसं आलं असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा हा पुरावा आहे. असा मेसेज व्हायरल होत असल्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसोबत गुन्हे करायचे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढे धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणातून वगळण्यात आलं होतं, अशी माहितीही समोर आली आहे.
काय आहे हे नेमकं प्रकरण ?
18 एप्रिल २००७ चं हे प्रकरण आहे. किशोर श्रीरंग फड यांनी ही पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. या एफआयआरमध्ये धनंजय पंडीत मुंडे, रामेश्वर व्यंकटराव मुंडे आणि वाल्मिक कराड अशी आरोपींची नाव आहेत. सदरील तारखेला परळीतील स्टेडियमधील सांस्कृतिक सभागृहात भंगार लिलावाचा कार्यक्रम होता. किशोह फड हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने तिथे पोहोचले असता धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यास २० ते २५ जणांनी गाडी अडवली आणि धनंजय मुंडे म्हणाले की, आज भंगाराचा टेंडर आहे. त्यामुळे तू बोली लावू नकोस. सदर टेंडरक मी घेणार आहे. त्यावर फड म्हणाले की, मी बोली लावू शकतो ही लोकशाही आहे. असं म्हटल्यावर धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी माझ्या मेव्हुण्याच्या स्कॉर्पिओवर रॉकेल ओतलं. त्यामुळे मी आणि माझा ड्रायव्हर बालाजी घुले असे आम्ही दोघे जण गाडीत होतो. तेव्हा धनंजय मुंडेंच्या हातात रिव्हॉल्व्हर होती. रामेश्वर मुंडेच्या हातातही रिव्हॉल्व्हरहोती. धनंजय मुंडे यांनी माझ्यावर रिव्हॉल्व्हरवरून ताणून धरली आणि मला म्हणाले की, खाली उतरला तर आणि गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. त्यानंतर आमची स्कॉर्पिओ गाडी पेटवून दिली. आम्ही घाबरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी दरवाजा दाबून धरला. तसंच सोबतच्या लोकांनी आमच्या गाडीवर तुफान दगडफेक सुरू केली. ती लोक थोडी बाजूला झाली तेव्हा आम्ही बाहेर पडलो.
त्यावेळी माझे शर्ट जळाले आणि उजवा हात जळाला. संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली. या गाडीची किंमत साधारणपणे ८ लाख रुपये होती. सदरचा प्रकार पाहून त्यावेळी अभिजित पंढरीनाथ मुंडे, संजय प्रल्हादराव बचाटे आणि सायस भोदाले आणि इतर लोकांनी येऊन धाव घेतली आणि सोडवा सोडव केली. तेव्हा ते लोक तिथून निघून गेले. या प्रकरणी परळी पोलिसांनी धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराडसह २५ जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला होता.