
दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर( पुणे ) अहिल्या नगर पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा, अहिल्यानगर येथील माऊली सतीश गव्हाणे यांच्या निर्घृण खून प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दि. (१६) रात्री एका आरोपीला अटक केली. सागर दादा भाऊ गव्हाणे ( वय २० वर्षे रा. दाणेवाडी. तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर ) असे आरोपीचे नाव असून त्यांनी खुनाची कबुली
दिली आहे .
अधिक माहितीत असे की, आरोपी सागर गव्हाणे याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली असून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यामुळे अहिल्या नगर पोलिसांना दाणेवाडी येथील निर्घृण खुनाचा छडा लावण्यात यश आले असून , दुसरा प्रमुख आरोपी दाणेवाडीचा आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरची घटना समलैंगिकेतून झाली असून सागर गव्हाणे व दाणेवाडी येथील दुसरा युवक याचे समलैंगिक संबंध होते आणि ते संबंध माऊली गव्हाणे यास माहित होते त्यामुळे सागर गव्हाणे व त्याच्या मित्रांनी माऊली गव्हाणे याचा इलेक्ट्रिक कट्टर च्या साह्याने निर्घुन खून केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तसेच या घटनेमध्ये आणखी तीन आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचाही शोध सुरू असून त्यांचे मुसक्या लवकरच आवळल्या जातील असे अहिल्यानगर पोलिसांनी सांगितले
सदर गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी दिनेश आहेर व अंमलदार यांनी केला.