दैनिक चालु वार्ता पाटोदा प्रतिनीधी: सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): वन विभागाने कारवाई करत खोक्या ऊर्फ सतिश भोसले याचे शिरुर येथील वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करुन बांधलेले घर वन विभागाच्या अधिकार्यांनी पाडले आहे. आज दिनांक 16 मार्च 2025 रोजी आष्टी पाटोदा शिरुर चे आमदार सुरेश आण्णा धस यांनी खोक्याच्या पाडण्यात आलेल्या घराला तसेच घर पाडल्याने उघड्यावर आलेल्या त्याच्या कुटुंबाला भेट दिली. या वेळी खोक्याचे घर पाडण्याच्या कारवाईला वन विभागाने घाई केली असा सवाल आमदार सुरेश आण्णा धस यांनी उपस्थित केला असुन वन विभागाच्या अधिकार्यांनी नेमके कुणाच्या आदेशाने कारवाई केली? या बाबत अधिकार्यांशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगीतले.
“खोक्या उर्फ सतिश भोसले हा काही ऐवढा मोठा गुंड नाही!”
खोक्या ऊर्फ सतिश भोसले हा काही ऐवढा मोठा गुंड नाही. गेली साठ वर्षापासुन खोक्या व त्याचे कुटुंब या ठिकाणी राहते. असा खुलासा आमदार सुरेश धस यांनी केला असुन खोक्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबत सकारात्मकता त्यांनी दाखवली.
“घरावरील CCTV फोडले? दस्ताऐवज ही जाळले?”
खोक्याच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश आण्णा धस यांच्या समोर खोक्याच्या कुटुंबांनी आपल्या व्यथा मांडत घरात असलेले आमचे कागदपञ (आधारकार्ड वगैरे) जाळले असुन कारवाईसाठी आलेल्या अधिकार्यांनी घरावरील सीसी टिव्ही असल्याचे निदर्शनास आल्यास सी सी टिव्ही कॅमेरा देखील नष्ट केला असल्याचा खुलासा केला आहे. यावरुन नेमके कोणते पुरावे नष्ट करण्यासाठी घर पाडण्याची घाई करण्यात आली असा प्रश्न निर्माण होत आहे.
“वन विभागाच्या बोगस कामाची विचारणा करणार?”
सदर भेटी दरम्यान आमदार सुरेश आण्णा धस यांनी शिरुर तालुक्यात वृक्ष लागवड शुन्य टक्यावर आलेली असुन दर वर्षी वृक्ष लागवडीच्या नावावर लाखोंचा निधी वन विभाग खर्च करत आहे. वन विभाग नेमके काय काम करतय हे जरा बाहेर येवु द्या? असा खुलासा करुन वनविभागाच्या कामाची चौकशी करणार असल्याचे सांगीतले असुन आमदार सुरेश आण्णा धस आता वनविभागाच्या बोगस कामाबाबत काय चौकशी लावणार? चौकशी फक्त शिरुर तालुक्यातीलच कामाबाबत करणार की संपुर्ण आष्टी मतदार संघातील वन क्षेञावरील बोगस कामाची करणार? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
“ढाकणे कुटुंबाची घेतली भेट!”
खोक्या उर्फ सतिश भोसले याने मारहाण केलेल्या ढाकणे कुटुंबाची देखील आमदार सुरेश आण्णा धस यांनी भेट घेवून ढाकणे पिता पुञांच्या तब्येतीची विचारपुस केली. यावेळी ढाकणे कुटुंबांनी मारहाणीत झालेल्या जखमा त्यांना दाखवल्या.