
दैनिक चालु वार्ता म्हसळा – (रायगड)प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – २७ वर्षा पूर्वी ८ गाव आणि ४ वाड्यांसाठी १३.५ कोटी रुपये खर्च करून तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे.सदरच्या योजनेचे पाणी सुमारे ७ किमी अंतरावरील पाभरे धरणाचे उद्भव विहिरीतून खार जमिनी मधुन लोखंडी पाईप लाईनद्वारे कार्यान्वित आहे.समुद्र खाडीच्या खाऱ्या पाण्यात योजनेचे लोखंडी पाईप जंग लागुन अकार्यक्षम झाले आहेत आता ही योजना वारंवार नादुरुस्त होत असते.ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याची गरज असताना पाणी पुरवठा योजना बंद पडली आसल्याने हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.या योजनेची दुरूस्ती करून लागलीच कार्यवाही करण्यात यावी यासाठी तोंडसुरे पंचक्रोसितील शेकडो महिलांनी म्हसळा जीप पाणी पुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. पाण्यासाठी तोंडसुरे ग्रामस्थ महिलांचे मोर्चाची खासदार सुनिल तटकरे,श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा महाराष्ट्र राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लागलीच दखल घेऊन रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांना योजनेची दुरूस्ती करीता निधीची उपलब्धता करण्याचे आदेश दिले होते. मुख्याधिकारी अलिबाग डॉ.भरत बास्टेवाड यांनी लागलीच त्यांचे अधिकारात २१ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.योजनेच्या दुरुस्तीचे प्रशासकीय मंजुरी पत्र योजना समिती शिखर परीषद अध्यक्ष माजी सभापती महादेव पाटील यांना प्राप्त झाला असल्याचे समिती अध्यक्ष महादेव पाटील यांनी वार्तालाप करताना सांगीतले.प्रशासकीय मान्यता पत्रात ग्रामीण पाणी पुरवठा रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्राम विकास व जलसंधारन विभागा कडून शासन निर्णय दि.६/९/२१ अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८ मधील नियम ४ खालील परिशिष्ट २ मध्ये केलेली सुधरणा अन्वये विकास कामे व योजना यांना प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी आसलेल्या अधिकारात तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा दुरुस्तीचे आणि मागिल अपूर्ण कामे करण्यासाठी २१ लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे.या कामी खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या आदेशाने म्हसळा तोंडसुरे गावातील भीषण पाणी टंचाईचे संकट आता टळणार आहे.तोंडसुरे गावावर भीषण पाणी टंचाई ओडविली असल्याने पाच दिवसांपूर्वी पंच क्रोशितील शेकडो महिलांनी म्हसळा पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता त्या मोर्चाची खासदार सुनिल तटकरे,मंत्री आदिती तटकरे आणि रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांनी दखल घेतली असता योजनेच्या दुरुस्तीला तब्बल २१ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने महिलांच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडकलेल्या हंडा मोर्चाला चांगलेच यश मिळाले असल्याची चर्चा होेत आहे.