
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
(अहमदपूर तालुका शाखेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेली 16 वर्षे सामाजिक विविध उपक्रमाने कार्यक्रम संपन्न )
===================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेली सोळा वर्षा पासून अवडनार विषय चालू ठेवला आहे. समाज प्रबोधिनी गुणगौरव सोहळ्यात समाजामध्ये काहीतरी विशेष उल्लेखनीय कार्य केले तर त्यांचा सन्मान होतो आणि सन्मान झाल्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात असे मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘समाज प्रबोधिनी’ गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, या वेळेस ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांची विशेष उपस्थिती होती. डॉ.अंजली उगिले, संगीता खंडागळे, अनुराधा नळेगावकर, ब्रह्मकुमारी छाया दीदी, डॉ.पल्लवी कराड, डॉ सिमा जाबोवणे, श्रीकांत बनसोडे, आनंद श्रीमगले पोलीस निरीक्षक , वर्षा माळी , अनिता कसबे, ॲड.नाथराव देमगुंडे, भालचंद्र आलापुरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी समाजाला शाहणे करण्याचे काम स्वतःचा बळी देऊन केले. माणसांमध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. जगामध्ये करणी, भानामती, जादूटोणा अशा प्रकारच्या कोणत्याही बाबी नसतात. या सर्व थोतांड आहेत. अशा गोष्टींच्या महिलांनी बळी पडू नये असे आवाहनही यावेळी नामदार पाटील यांनी केले. महिला आज सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत.
यावेळी मंगल सचिन कानगुले अहमदपूर , प्रा.इशरत शादुल पठाण, डॉ. सोनल दिलगीर रामटेक भोपळा, प्रा.वैशाली अनिल जाधव नादेड, ललिता राजकुमार जाधव नांदेड, वैष्णवी रामकिशन सोळंके जालणा, विजया नागनाथ श्रीमंगले शिरुर ता, सावित्री हनुमंत अडकुते देगलूर, सुरेखा वसंत आचार्य बिदर, गंगासागर पांडुरंग गायकवाड अहमदपूर,शहिर अपेक्षा शेषकुमार डाके लातूर, प्रा.उषा मनोहर काटे पालम या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.वृषाली किन्हाळकर यांनी ‘स्त्री काल, आज व उद्या’ या विषयावर व्याख्यान देताना सांगितले कालच्या व आजच्या स्त्रीमध्ये फार बदल झाला असून मागील काळात मुलगी झाली तर नातेवाईक नाराज होत होते परंतु सध्याच्या काळात ते चित्र फारसे दिसत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष उद्धव इप्पर, उपाध्यक्ष डॉ.अतुल खडके, प्रधान सचिव प्रा.रत्नाकर नळेगावकर, कार्याध्यक्ष मेघराज गायकवाड, शिला घाटोळ, रोहिणी केंद्रे,डा पुनम केंद्रे, आशा रोडगे, सुरेश डबीर, भालेराव चंद्रशेखर, अजहर बागवान, सुरेखा उपरवाड, अंजली वाघंम्बर, वैशाली कदम, पूजा गायकवाड, सुप्रिया पाढरे,ॲड पल्लवी गायकवाड. गोपाल पटेल दयानंद जाधव.ई यांची उपस्थिती होती.या। कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा माळी, प्रा मारोती पाटील यानी केले पुरस्कार व व्याख्यानास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते….