
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
आदिवासी समाजातील कोळी मल्हार जमातीची विचार मंथन सभा डहाणू मधील कासा येथे रविवारी आयोजित करण्यात आली. यावेळी पालघर मधील डहाणू, पालघर, विक्रमगड, वसई तसेच वाडा मधील तसेच भिवंडी, शहापूर, ठाणे या भागातील कोळी मल्हार बांधव एकत्र येथे आले होते. पालघर, ठाणे तसेच मुंबई उपनगरामध्ये ही जमात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. आदिवासी समाजाच्या अस्तिव, संघर्ष व संस्कृती मध्ये या जमातीचे मोठे योगदान आहे. मात्र सध्या ह्या आदिवासी च्या बोगस घुसखोरी मध्ये या जमातीत मोठ्या प्रमाणात घूसखोरी होत आहे.कोळी मल्हार समाज महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण समाज आहे, ज्यांची संस्कृती, परंपरा, आणि इतिहास समृद्ध आहेत.यामध्ये समाजातील काही महत्वाचे पैलू आहेत, यावेळी उपस्थित विचारवंतानी काही महत्वाच्या विषयावर सभेमध्ये प्रकाश टाकण्यात आला यामध्ये कोळी मल्हार समातीच्या संस्कृती आणि परंपर मधील,ग्रामदेवता: मल्हार कोळी समाजाच्या ग्रामदेवता म्हणजेच दैवताला विशेष महत्त्व आहे. गावातील सण आणि उत्सवांमध्ये ग्रामदेवतेची पूजा केली जाते.
सण आणि उत्सव: समाज विविध सण आणि उत्सव साजरे करतो, ज्यामध्ये नृत्य, संगीत, आणि पारंपरिक कला यांचा समावेश असतो.नृत्य आणि कला: पारंपरिक नृत्य आणि कला प्रकार समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. स्त्रियांचे स्थान,हुंडा प्रथा: समाजात हुंडा घेण्याची प्रथा नाही, ज्यामुळे स्त्रियांचे स्थान अधिक सन्माननीय आहे.
विधवा स्त्रिया: विधवा स्त्रियांना समाजात सन्मानाने वागवले जाते आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी केले जाते.याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कोळी मल्हार समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या परंपरा, कला, आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक महोत्सव, आणि संशोधन यांचा उपयोग होऊ शकतो. यामुळे आगामी पिढ्यांना त्यांच्या समृद्ध वारशाची ओळख होईल आणि समाजाच्या प्रगतीस हातभार लागेल.यावेळी या विचार मंथन मध्ये माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार अविनाश सुतार, पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाढाण, सुनिल झळके, माजी समाज कल्याण सभापती पांडुरंग बेलकर, विलास बेलकर, नरेंद्र काळे, लतिका बालशी, स्नेहलता सातवी,पत्रकार निलेश कासट, सतेंद्र मातेरा तसेच अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच,सामाजिक कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.या सभेचे सूत्रसंचालन नितीन बोंबाडे यांनी केले.