
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
लोहा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी फाॅर्मर आयडी (शेतकरी ओळख पत्र) काढून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी कंधार सौ.अरुणा संगेवार यांनी लोहा तालुक्यातील मौजे पारडी येथे फाॅर्मर आयडी काॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी केले.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून येथील जवळपास ७० ते ८० टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन अनेक विविध योजना राबवित आहे, त्यांना अनुदान देत आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचे ओळख पत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी आता शासन शेतकऱ्यांना फाॅर्मर आयडी देत आहे ते सर्वांना मिळावे यासाठी ग्राम महसूल अधिकारी परशुराम जाधव यांनी उपविभागीय अधिकारी कंधार सौ. अरुणा संगेवार व लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारडी येथे फाॅर्मर आयडी काॅम्प आयोजित केले होते.
त्या अनुषंगाने लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फाॅर्मर आयडी काढून घ्यावे यासाठी दि. १७ मार्च २०२५ रोजी लोहा तालुक्यातील मौजे.पारडी येथे फाॅर्मर आयडी काॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या फाॅर्मर आयडी काॅम्पचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी कंधार सौ.अरुणा संगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्राम महसूल अधिकारी परशुराम जाधव, पारडीच्या सरपंच सुमनबाई डिकळे, ग्राम पंचायत अधिकारी अरुण चौधरी, संभाजी पवार, गोविंद डिकळे, पोलिस पाटील विनायक मटके, उध्दव डिकळे, शंकर डिकळे, व्यंकटी डिकळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी कंधार सौ.अरुणा संगेवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फाॅर्मर आयडी वाटप करण्यात आले.