
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहू दि १७रोजी शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. देहू मध्ये देखावे हनुमान मुर्ती सह ढोल ताशे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली .
तिथीनुसार जिल्ह्यात सर्वत शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध संघटना, संस्था, शाळा-महाविद्यालये, राजकीय पक्षांनी यात सहभाग घेतला. देहू शहरात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, या पक्षांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमात महिला नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
देहू कमानी जवळ पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी केली.
पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजंयती साजरी केली. या गणेश मित्र मंडळ, आदी संघटनांतर्फेही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी योगेश काळोखे स्वप्निल आप्पा काळोखे योगेश परंडवाल पोलीस पाटील टिळेकर सुनील हगवने सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
विठ्ठल वाडी पासुन शिवजयंती उत्सवात सुरुवात केली
डीजेसह फटाके वाजवून महीला ढोल ताशे वाजत गाजत कमानी जवळ हनुमान मंदिर शिव चौक मंदिरात कडे . मिरवणूक काढण्यात आली
पोलिसांचा कडक बंदोबस्त
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
देहू उत्सवाकडे लक्ष
शिवजयंतीचे मिरवणुकीत हनुमानची मुर्ती हुबे उभ करून शक्तीप्रदर्शन केले. फटाक्यांच्या आतषबाजीत नेत्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला शांतपणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली