दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील मिरकले नगर येथील विद्यावर्धिनी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी साप आणि अन्य वन्यजीवांचे बचावकार्य कसे करावे या बाबतीत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे
नैसर्गिक वातावरणात होणारे बदल व प्राणी जीव आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे तरी विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी त्याचबरोबर वन्यजीव कायदा माहित व्हावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या संस्था सचिव तथा मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांची उपस्थिती होती.या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सर्पमित्र सुदर्शन पाटील होते. या कार्यशाळेला उपस्थित सुदर्शन पाटील यांनी विद्यार्थ्यांना वन्य प्राण्याविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यांनी सर्पाविषयीच्या अनेक जाती त्यामध्ये विषारी बिनविषारी सापांची माहिती दिली .
आपल्या शाळेतील परिसरातील भागात आढळणारी मण्यार फुरसे ,घोणस ,नाग अशा प्रजातीची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली त्याचबरोबर लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा त्याचबरोबर असलेले गैरसमज याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आपल्या घरी किंवा परिसरात असे साप आढळले तर त्यांना न मारता सर्पमित्रांशी लवकर संपर्क करावा सर्व भिन्न जीवांचे प्राण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे गरजेचे आहे असे बहुमलाचे मार्गदर्शक केले. कार्यक्रमाचे संचलन आकाश जाधव यांनी केले तर आभार, हुसेन पठाण यांनी मानले आहे