
मुंबई कोर्टाकडून दिलासा…
महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होता. याचा निकाल लागला असू बच्चू कडू यांना कोर्टानं दिलासा दिला आहे.
त्यांच्याविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बच्चू कडू यांनाकोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांची बँकेच्या संचालक पदावरुन हटवण्यासाठी विभागीय सहनिंबधकांनी त्यांना 7 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली होती. त्यावर मंगळवारी कोर्टात सुनावणी झाली.
न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली असताना अशा स्थितीत बच्चू कडू यांना शिक्षा झाल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्हा बँकेच्या विरोधी संचालकांनी त्यांना बँकेच्या अध्यक्षपदी राहण्यास अपात्र घोषित करण्याच्या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टानं रद्द देली आहे.
बच्चू कडू यांच्या विरोधात अपात्रतेचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाचा हा निर्णय बच्चू कडू यांना मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे त्यांचे बँकेचे अध्यक्षपद कायम राहणार आहे.