
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
इफेक्ट ऑफ दैनिक चालु वार्ता
दैनिक चालु वार्ता च्या बातमीमुळे इफेक्ट तर आली शासनाला उशिरा जाग..! स्थानिक नागरिकांनी मानले पेपरचे विशेष आभार
अहमदपूरातील कराडनगर भागातील सार्वजनिक नळ कलेक्शन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने आली शासनाला उशीरा जाग?
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील नांदेड ते लातूर हायवे लगत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतेच्या जवळ असलेल्या कराड नगर या परिसरातील प्रवेश करता वेळीच असलेल्या सार्वजनिक नळाचे कनेक्शन मागील अनेक दिवसापासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे याकडे नगरपालिकेतील कर्मचारी, इंजिनियर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष दुर्लक्ष होताना दिसून येत होते व स्थानिकांनी नागरिकांनी दूरध्वनीवर संपर्क केल्यानंतर उडवा उडवी चे उत्तर मिळत असल्यास स्थानिक नागरिकांची नाराजी दिसून येत होती म्हणून दैनिक चालू वार्ता अहमदपुर प्रतिनिधी यांनी स्थानिक नागरिकांनाच्या मागणीवरून दाखला घेऊन बातमी घेतली त्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या समावेत फोनद्वारे संभाषण करून काम करण्यास भाग पाडले आहे
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हजारों लिटर पाणी रस्त्यावर वाहत जाऊ नये म्हणून प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यावर असणारे कर्मचारी पूर्ण लक्ष ठेवून काम करत आहेत म्हणून स्थानिक नागरिक यांनी आनंदाचे वातावरण तरी दिसून येत आहे परंतु पुढील काळात असल्या घटना व पाणी वाया जाऊ नये म्हणून कायमचा प्रबंध ,उपाययोजना करतील का? हा मात्र प्रश्न अजुन तरी कायम राहणार आहे..
एकीकडे पाणी वाचवा. पाणी कमी जपून वापरा अशी भूमिका व जाहिराती करत असताना दुसऱ्या बाजूला नगरपालिकेची दुपटी भूमिका लोकांची हेळसांड असे प्रश्नांना स्थानिक नागरिकांना असंतोष निर्माण होताना दिसून येत आहे
म्हणून यावर उन्हाळ्याच्या दिवसात कठोर व सूक्ष्म नियोजन करणार का थेट सर्वसामान्य जनतेचा प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे.
=================
उपजिल्हाधिकारी
श्रीमती मंजुषा लटपटे नगरपालिका प्रशासक यांचे मनोगत
स्थानिक नागरिकांच्या मुलभूत सुविधा देत असताना काही तांत्रिक कारणामुळे राहिल असेल ते पुर्ण करु यात असे मत व्यक्त करून आम्ही तो कार्य वेळेतच पूर्ण करू अशी आश्वासन दूरध्वनीवरून बोलताना त्या बोलत होत्या.