
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
(अनुसूचित जातीतील अ ब क ड वर्गीकरण तर क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाजाच्या अभ्यास आयोगाची अंमलबजावणी तात्काळ लागू करणे संदर्भात तहसीलदार मार्फत दिले मुख्यमंत्री यांना निवेदन)
(20 मे 2025 पर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करणार अशी मातंग समाजाची भूमिका निश्चित करण्यात आली आहे यांचे निवेदन देण्यात आले)
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील तहसील कार्यालयाचे प्रमुख तहसीलदार सौ उज्वला पांगारकर यांना सकल मातंग समाजाच्या वतीने अ ब क ड जातीय वर्गीकरण करणे बाबत तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले तर यात लहुजी साळवे आयोगाच्या सर्व शिफारशी तात्काळ लागू करण्याबाबत निवेदन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की मागील काळात मातंग समाज व तत्सम जातीचा शैक्षणिक व इतर क्षेत्रात जसा पाहिजे तसा विकास झाला नाही त्यामुळे लहुजी साळवे आयोगाच्या सर्व शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्यात , सकल मातंग समाजांना अ ब क ड वर्गीकरण करून जातीय जनगणना करून मिळावे या मागणीचे निवेदन अहमदपूरातील सकल मातंग समाजातील बंधूनी यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की एक ऑगस्ट 2024 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल राज्यांना लागू करण्यात यावा व 18 मार्च 2025 रोजी घटित केलेली समिती नुसार अ ब कड वर्गीकरण करण्यात यावे असे निवेदन यावेळी देण्यात आले आहे. आरक्षण उप वर्गीकरण होत नाही तोपर्यंत शासन भरती करण्यात येऊ नये अशी याची निवेदनात नमूद केले आहे
न्यायमूर्ती बटर समितीने अनुसूचित जातीतील 59 जातीची आजची लोकसंख्या गृहीत धरून वर्गीकरण करण्यात यावे हा एक मुद्दा या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. वीस वर्षे झाले तरीही 68 शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत ते तात्काळ लागू करण्यात यावेत.
अनुसूचित जातीतिल आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करणे आणि लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या शासनाने स्विकारलेल्या शिफ़ारशी तात्काळ लागू कराव्यात असे निवेदन तहसीलदार द्वारा मुख्यमंत्री म. राज्य यांना देण्यात आले 20 एप्रिल 2025 पर्यंत सदरील निवेदनाची मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांनी या मागणीची दखल घेऊन तात्काळ लागू करण्यात यावी अन्यथा 20 मे 2025 ला मुंबई येथे आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याची निवेदनात नमूद केले आहे.
या वेळी उपस्थित समाज बांधव
भगवान वाघमारे,डि एस वाघमारे, डॉ गंगाधर साखरे, गणेश वाघमारे, रामनाथ पलमटे भानुदास कंचकटले, संभाजी दुर्गे, डॉ बालाजी वाघमारे, भानुदास गायकवाड,दिनकर कोंडिबा कुडके,लोंहबंदे गोविंद नागोराव, संभाजी आकृपे, युवराज मोरे,सोमाजी वाघमारे,मनोहर सुर्यवंशी, श्रावण वाघमारे, नरसिंग कांबळे,हारगिले बि जी, केंद्रे उत्तमराव मोतीराम, प्रकाश कांबळे, व सकल मातंग समाजातील समाजबांधव यावेळी उपस्थित