
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : नागपूर येथील घटनेनंतर शिरूर शहर-ग्रामीण पोलिस अलर्ट झाले असून व्हॉट्सॲप, फेसबूक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर दररोज २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.दोन समाजात, धर्मात तेढ निर्माण होणारी पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे .शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांना आवाहन व निर्देश दिले आहेत.
कोणत्याही समाजातील जनतेच्या भावना दुखावतील किंवा दोन समाजामधील तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह संदेश, फोटो किंवा ध्वनिफीत कोणतीही शहानिशा न करता प्रसारित करू नये किंवा कोणत्याही खोट्या अफवा पसरवू नये जेणेकरून त्यामुळे दोन समाजात तणाव निर्माण होतील अश्या प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह मजकूर किंवा ध्वनिफीत आढळल्यास संबंधित इसमास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल.पोलीस सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत तरी अशी कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा संदेश, ध्वनिफीत आढळल्यास संबंधित ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून महाराष्ट्र पोलीस कायदा व भारतीय न्याय संहिता याप्रमाणे कार्यवाही केली जाईल याची संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी .