
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी. श्रीक्षेत्र आळंदी.आपल्या 2 वर्षांच्या काळात शाळांचे दर्जावर्धन, इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सटीपी प्रकल्पाची सुरुवात,आकर्षक बाल उद्यानाची निर्मिती,नगरपरिषद उत्पन्न वाढीसाठी शॉपिंग सेंटर बांधकाम,4 वाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन, शिवसृष्टी,तुळशी वृंदावन,माऊली- चांगदेव भेट, सिद्धबेट परिसर विकास अश्या अनेक सर्वच क्षेत्रातील दर्जेदार कामामुळे आपली वेगळी छाप पाडणारे व शहरातील सामान्य नागरिक, वारकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेले आळंदी नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची पदोन्नतीने आळंदी येथून बदली झाली असून त्यांची लातूर महानगरपालिका ‘उपायुक्त‘ पदी नियुक्ती झाली आहे.आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून कैलास केंद्रे यांनी केलेल्या कामांमुळे आळंदी शहराच्या वैभवात मोठी भर पडली असून ते आपल्या कामातून आळंदी करांच्या कायम आठवणीत राहतील.
कैलास केंद्रे यांच्या २ वर्षांच्या कार्यकाळात झालेली उल्लेखनीय कामे:
(१) इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्व पूर्ण असणारा व अनेक वर्ष रखडलेला एसटीपी प्रकल्प चे प्रगती पथावर असणारे काम
(२) शाळा क्रमांक ४ च्या २ मजली
इमारतीचे प्रगतीपथावर असलेले बांधकाम
(३) शाळा क्रमांक १ चे अत्यंत सुंदर नुतनीकरण,शाळा क्रमांक २ येथे सीएसर निधीतून ६ कॉम्प्युटर्स उपलब्ध करून घेवून सुरू करण्यात आलेला संगणक कक्ष,शाळा क्रमांक ३ येथे टॉयलेट ब्लॉक बांधून विद्यार्थ्यांची दूर केलेली गैरसोय
(४) आळंदी नगरपरिषदेच्या शाळांसाठी २१ अतिरिक्त शिक्षकांची मंजूर झालेली पदे
(५) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर उभारलेली आकर्षक शिवसृष्टी
(६) नेहमी कचऱ्याचे ढीग व ओंगळवाणे फ्लेक्स यांनी व्यापून असलेल्या चाकण चौक येथे मनमोहक अशा तुळशी वृंदावन ची उभारणी
(७) भैरवनाथ चौक येथील माऊली चांगदेव यांच्या भेटीवर आधारित शिल्पाची उभारणी
(८) आळंदी नगरपरिषद शॉपिंग सेंटरचे अंतिम टप्प्यात असणारे बांधकाम
(९) प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पीएमपीएल बस स्टॉप येथे पुरुष व स्त्रिया यांच्यासाठी सुसज्ज टॉयलेट ब्लॉक चे प्रगती पथावर असणारे बांधकाम
(१०) बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या आळंदीतील एकमेव व आकर्षक अश्या “हरिपाठ बाल उद्यान” निर्मिती.
(११) नमामी चंद्रभागा अभियानातून इंद्रायणी नदी घाटाच्या कामाची झालेली सुरुवात
(१२) आळंदी नगरपरिषद टाऊन हॉल चे नुतनीकरण व सुंदर स्वागत कमानीची उभारणी
(१३) तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात ३% निधीची केलेली तरतूद
(१४) शहरातील सर्व दिव्यांग बांधवांचा प्रत्येकी 4 लाखांचा काढलेला विमा
(१५) माऊलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘सिद्धबेट‘ परिसरात वृक्षारोपण,विद्युत प्रकाशाची व्यवस्था इत्यादी माध्यमातून सकारात्मक केलेला बदल