
देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताच टाळ्यांचा कडकडाट…
महायुती मनपा निवडणूक एकत्र लढणार, मुंबईत एकत्र आहोतच , जिथे शक्य तिथे एकत्र, मुंबईत एकत्र हे पक्के, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना महायुतीतसोबत घेणार का?, असा सवालही विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंच्यासंबंधात आजतरी निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय ते घेत असतात. त्या त्यावेळी विचार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाही…असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या या उत्तरानंतर उपस्थितांनी टाळ्या देखील वाजल्या.
देवेंद्र फडणवीसांनी रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले, यावरे त्यांनी कोणते उत्तर दिले पाहा-
1. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?
देवेंद्र फडणवीस- नाही
2. लाडके उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस- दोघेही माझे लाडके आहेत आणि मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहोत.
3. लाडके ठाकरे कोण?, उद्धव ठाकरे की राज ठाकरे?
देवेंद्र फडणवीस- ठाकरे अशे आहेत की त्यांना आपण लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं, त्यामुळे यामध्ये आपण काय पडायचं, पण एक खरं सांगतो, गेल्या 5 वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही, माझा राज ठाकरेंसोबतच संबंध राहिलाय. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले, म्हणजे मारामारी नाहीय, समोर आलो की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो, पण उद्धव ठाकरेंसोबत संबंध नाही.
4. लाडका मंत्री कोण, गिरीश महाजन की नितेश राणे ?
देवेंद्र फडणवीस- लाडके मंत्री योजना सुरु केलेली आहे. त्याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणे अर्ज घेतलेले आहेत. त्याचं प्रोसेसिंग सुरु आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर सांगतो.
5. सर्वात जास्त नाराजीनाट्य कोण करतं?, अजितदादा की एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस- नाराजीनाट्य वैगरे कोणीच करत नाही. अलीकडच्या काळामुळे, सोशल मीडियामुळे कोणत्याही गोष्टीला कसेही सांगितले जाते. माझा अनुभव असा आहे की, अजितदादा असो की एकनाथ शिंदे, दोघांचीही नाराजीनाट्य नाही. काही प्रश्न असतात, ते आम्ही एकत्र येऊन सोडवतो. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक हा भावनिक असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे भावनिक आहेत. तर अजितदादा कामाच्या बाबतीत प्रॅक्टिकल आहेत.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाले ?
आपण जर बघितलं तर या संपूर्ण चर्चेमध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही तरीही आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, याचा एकमेव कारण असा आहे की, या संपूर्ण प्रकरणांमध्ये ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड आहे. वर्षानुवर्ष धनंजय मुंडे यांचे राजकारण त्यांनी सांभाळलेला आहे आणि म्हणून सहाजिक महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की अशा प्रकारे जर नेत्यांच्या जवळचे लोक इतका क्रूर अशा प्रकारचा काम करत असतील तर नेत्यांनी काही ना काही तरी पश्चाताप म्हणून किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो. नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे नंतर किंवा चर्चेत गेल्यानंतर दोन गोष्टी क्लियर झाल्या. एक चर्चेतमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि दोन वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर आमची चौकशीची आणि कारवाईची तयारी आहे, पण उगीच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.