दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
संभाजी ब्रिगेड मंठा च्या वतीने मागील सात ते आठ महिन्यापासून शासनाच्या परिपत्रकनुसार ग्रामसेवक हे मुख्यालयी वास्तव्यास असणे बंधनकारक असतानाही संपूर्ण मंठा तालुक्यात एकही ग्रामसेवक हा मुख्यालयी वास्तव्यास राहत नाही.हाच प्रश्न घेऊन विधान परिषद तारांकित प्रश्न क्र.701विधान परिषद सदस्य मा. आ.श्री राजेश राठोड,श्री.अशोक उर्फ भाई जगताप,श्री.सतेज उर्फ बंटी पाटील,श्री.अभिजित वंजारी,श्री,डॉ.प्रज्ञा सातव,श्री.जयंत आसेगावकर,श्री.सुधाकर अडबाले,श्री.धिरज लिंगाडे या सर्व आमदारांनी मांडला.
शासनाच्या परिपत्रकनुसार ग्रामसेवक हा मुख्यालयी वास्तव्यास असावा ह्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने मागील अनेक महिन्यापासून पंचायत समिती मंठा यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले.
त्याच बरोबर तालुक्यातील सर्व गावोगाव जाऊन स्वाक्षरी मोहीम अभियान राबवून ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नाही.या बाबत एकूण 117 गावात जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.काही काही गावात तर अशी परिस्थिती आढळून आली की सहा सहा महिन्यापासून ग्रामसेवक येत नसल्याच्या अडचणी संदर्भात गावकऱ्यांचे व्हिडीओ असेल वा ऑडिओ पुरव्यासहीत पंचायत समिती याना देऊन पंचायत समिती समोर या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावर त्यांचे भाडे भत्ते बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
या नंतर संभाजी ब्रिगेड च्या वतीने सर्व पुराव्या सहित मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आले.
याचाच परिणाम म्हणजे पंचायत समिती मंठा याना मुख्यालयी राहत नसलेल्या सर्व दोषी ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्या संदर्भात प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.