
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गोवर्धन कोळेकर यांचा लोहा पोलीस ठाण्यात लोहा येथील मित्रपरिवारांच्या वतीने राजेश मुकदम, पारडीचे सरपंच डिंगबर डिकळे यांनी सत्कार केला.
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गोवर्धन कोळेकर हे २००७ ते २००९ असे तीन वर्षे लोह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काळात त्यांनी तंटामुक्ती अभियान प्रभावीपणे राबविले.शहरात व परिसरात त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. लोह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत फक्त भीमगिते वाजविण्याची सुरुवात तत्कालीन तहसीलदार कांबळे ,तत्कालीन नगराध्यक्ष मुकदम , पोलीस निरीक्षक कोळेकर याच्या काळात झाली.पुढे त्यांनी जेथे पोस्टिंग झाली तेथे हा उपक्रम सुरू केला त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोहा कोर्टात साक्ष देण्यासाठी ते आले होते.लोहा पोलीस ठाण्यात त्याचा राजेश मुकदम,माजी सरपंच डिंगबर,डिकळे, पत्रकार हरिहर धुतमल , रत्नाकर महाबळे, बालाजी डिकळे, सेक्युरिटी फिल्ड ऑफिसर विशाल,चव्हाण उपस्थित होते.माजी सरपंच दिगंबर डिकळे व ग्रामस्थांनी सुद्धा श्री कोळेकर यांचा सत्कार केला.