
दैनिक चालु वार्ता उमरगा वार्ताहर
उमरगा धाराशिव,
21 मार्च जागतिक वन दिन म्हणून, संपूर्ण देशात साजरी करण्यात येते,
उमरगा (धाराशिव) तालुक्यातील श्री सिद्धेश्वर विद्यालय कसगी, या शाळेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये पाच हजार वृक्षांचे लागवड संवर्धन आणि संगोपन करणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा असून,
संपूर्ण वर्षभरामध्ये शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यावर वृक्षांचे महत्व समजून घेऊन, वृक्षदिंडीच्या माध्यमातून गावकरी आणि समाजाला सुद्धा, या अभियानात सामील करून घेण्यासाठी, संपूर्ण गावात वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 24 -25 मध्ये या शाळेमध्ये फळझाडे फुलझाडे पर्यावरण संवर्धना साठी अनेक बहुवार्षिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या सर्व झाडांची काळजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणातील झाडाचे महत्व, आणि पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, म्हणून विद्यार्थी ग्रामस्थ तालुका लागवड अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी प्रशालेतील सर्व शिक्षक बांधव,
मुख्याध्यापक इको फ्रेंडली क्लब चे विभाग प्रमुख श्री मनोजकुमार गुरव सर
यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी, पथनाट्य, उद्बोधन घोषणा, वृक्ष लागवड करून वन दिन साजरे करण्यात आले