
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
रांजणगाव येथून जवळच असलेले मलठण (ता. शिरूर ) येथे नुकतेच जल जीवन मिशन राज्यपाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे ग्रामपंचायत स्तरावरील पाणी गुणता विषयक माहिती व प्रत्यक्ष प्रशिक्षण येथीलसाई प्रेम ग्राम विकास संस्था यवतमाळ अंतर्गत (शिरूर तालुका)मलठण येथील भैरोबा मंदिरामध्ये आशा वर्कर अंगणवाडी ताई असे एकूण 40 महिला यांनी उपस्थितातांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या सचिवा रीता, तसेच यशदाचे प्रवीण प्रशिक्षक जया माने, प्रतिभा डहाळे, साई प्रेम संस्थेचे समन्वयक राजेश गुंडाळे व कॉर्डिनेटर प्रतीक्षा किशोर निरवणे,जया माने इत्यादींनी पाणी शुद्धतेवर सखल मार्गदर्शन केले. स्वच्छता सर्वेक्षण व अंदाजपत्रक या विषयावर मार्गदर्शन केले. प्रतिभा डहाळे यांनी पाणी काटकसर या विषयावर सखोल माहिती दिली. तसेच पाणी गुणवत्ता व आरोग्य वापराबाबतची माहिती दिली, पाणी हेच जीवन असून, त्याचा अपव्य टाळावा, व पाण्याचे महत्व सर्वांनी जाणून घ्यावे असे सांगण्यात आले.