
दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – राज्याच्या महीला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.७०० हुन अधिक महिलांनी या शिबिरात भाग घेऊन फॅमिली हेल्थ,शारीरिक तंदुरुस्ती,मानसिक आरोग्य आणि योग्य आहार या विषयांवर माहिती घेतली.शिबिरात हेल्थ चेक-अप्,रक्तदाब तपासणी,शुगर तपासणी, वजन तपासणी,हाडांची घनता तपासणी,स्तनाचा कर्करोग तपासणी अशा विविध प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या गेल्या याशिवाय महिलांना विविध मानसिक आरोग्य विषयक सत्रांसाठी मार्गदर्शनही मिळाले जेणेकरून त्यांना आपल्या तणावाचे व्यवस्थापन,नैतिक स्वास्थ्य,योग्य विश्रांती घेणे बाबत मदत मिळाली.विविध व्यायाम आणि योगाच्या तंत्रांची सल्लागारांची मदत महिलांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे सक्षम बनवण्यासाठी करण्यात आली.महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे त्यांच्या तंदुरुस्तीचे महत्त्व सांगणे आणि त्यांना विविध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सुधारण्याची संधी देणे हे अशा शिबिरांचे मुख्य उद्दिष्ट आहे यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपल्या आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात अधिक सक्षम होता येते. आरोग्य शिबिराला
“डॉ. प्रफुल पावसेकर वैद्यकीय अधिक्षक,विविध तज्ञ वैद्यकीय अधिकारी,राष्ट्रवादी पक्ष तालुका अध्यक्ष समीर बनकर,तहसीलदार सचिन खाडे,पोलीस निरीक्षक संदिप कहाले,माजी सभापती महादेव पाटिल,जि. प.माजी सभापती बबन मनवे,किरण पालांडे,नाना सावंत,अनिल बसवत,रेश्मा कानसे, माजी सभापती छाया म्हात्रे,वृषाली घोसाळकर,सोनल घोले, महेश घोले,वनिता खोत,महीला अध्यक्षा मीना टिंगरे, अनिल टिंगरे,ग्रामिण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी,आशा ताई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.