
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
पुणे (इंदापूर):-चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस यज्ञेश बाविस्कर यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या निरीक्षक पदी निवड झाली आहे.
ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
बाविस्कर हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना मोठ-मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यामुळे त्यांना मोठा अनुभव आहे.
राष्ट्रवादीला नवसंजीवनी देऊन पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी संपुर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करून त्या त्या परिसरातील नेते कार्यकतै यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचे यज्ञेश बाविस्कर यांनी सांगितले.