
दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे ) निमोणे तालुका शिरूर जिल्हा पुणे गावच्या सरपंच पदी राजश्रीताई संदीप गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीचे सरपंच सुषमा भाऊसाहेब काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय ज्ञानदेव काळे, परशुराम भाऊसो अनुसे उपसरपंच, श्यामकांत राजहंस काळे माजी सरपंच, सौ. लिला दिलीप काळे, सारिका संतोष जाधव, पार्वती बापू सूर्यवंशी, स्वाती संतोष गायकवाड, श्रीमती लता जिजाबा ताठे, संजय सुभाष माळी हे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
राजश्रीताई गव्हाणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार खरात, व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शेळके यांनी जाहीर केले
या निवडीच्या वेळी निमोणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पांडुरंग दुर्गे साहेब, विजयराव भोस माजी सरपंच , गणपतराव अनुसे, विजयराव पोटे माजी ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बापूसाहेब जाधव, डॉक्टर संतोष जाधव, युवा नेते योगेश काळे, जिजा ताई दुर्गे माजी सरपंच, मनोजराव मूर्तीमोडे लेखनिक आणि आदी मान्यवर उपस्थित होते. निवड जाहीर झाल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली.
राजश्रीताई गव्हाणे यांनी यापूर्वी उपसरपंच म्हणून काम पाहिले, होते त्यांच्या कारकीर्द मध्ये गावाच्या विकासात मोलाची भर पडली. राजश्रीताई गव्हाणे या स्वर्गीय अर्जुनभाऊ नामदेव गव्हाणे यांच्या यांच्या सुनबाई आहेत स्वर्गीय अर्जुन भाऊ गव्हाणे यांचे सरपंच होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते ते सुनबाई यांच्या रूपाने पूर्ण झाले. सरपंच राजेश्री ताई गव्हाणे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष गव्हाणे यांच्या भावजय आहेत.