दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :-
तालुक्यातील मौजे ताटकळवाडी ग्रामपंचायत बाचोटी कॅम्प येथील सदस्या आशा वाघमारे यांना विभागीय आयुक्त संभाजीनगर यांनी निकाल देत ग्रामपंचायत सदस्य पदी कायम ठेवण्याचे आदेश देऊन क्लीन चिट दिली आहे.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की ग्रामपंचायत सदस्या आशा वाघमारे यांनी ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले म्हणून जिल्हा अधिकारी यांच्या कडे २०२४ मध्ये संग्राम वाघमारे व मच्छिंद्र पागे या दोघांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी गटविकास अधिकारी यांना स्थळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
गटविकास अधिकारी भोकर यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याचा अहवाल सादर केला होता.त्या आधारे जिल्हाधिकारी नांदेड व अप्पर विभागीय आयुक्त संभाजीनगर यांनी १० मार्च २०२४ रोजी आशा वाघमारे यांना सदस्य पदी अपात्र ठरविले होते.
अपात्र ठरविल्या नंतर वाघमारे यांनी या निर्णयावर नारजी व्यक्त करत संभाजीनगर खंडपीठात अपील दाखल केली असता या खंडपीठाने दि.१० एप्रिल २०२४ रोजी अपात्रतेला स्थगीती दिली होती.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व भुमी अभिलेख विभागाला स्थळ पहाणीसाठी आदेशीत केले असता स्थळ पाहणीसाठी जायमोक्यावर जाऊन पहाणी केली असता कुठल्याही प्रकारचे अतिक्रमणं दिसत नसल्याचे व सदस्य यांचे सासरे,दिर हे सगळे विभक्त राहत असल्याचा अहवाल सादर केला असता सर्व बाबीची पडताळणी करुन दि.५ मार्च २०२५ रोजी विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या न्यायालयाने आशा वाघमारे यांना क्लीन चिट देत त्यांचा अर्ज मान्य केला असुन त्यांना सदस्य पदी कायम ठेवण्याचे आदेश नांदेड जिल्हाधिकारी व सर्व संबंधितांना दिले आहेत.त्यामुळे आशा वाघमारे यांनी समाधान व्यक्त केले आहे.