दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना जिल्ह्सयात मागील 07 वर्षापासुन आयपीएल / क्रिकेट मॅचवर सट्टा लावलाने व चुकीवर प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल यांनी सुचना दिल्या होत्या सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन मा. अपर पौलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अनंत कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना, श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलीस ठाणे सदर बाजार हद्यीत मागील 07 वर्षापासुन आयपीएल / क्रिकेट बुकी यांचेवर दाखल गुन्हयाची माहीती घेवुन रेकॉर्ड वरील एकुण 16 इसमावर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, श्री. अनंत कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री. संदीप भारती पोलीस निरीक्षक पो.स्टे. सदर बाजार, श्री. भागवत कदम पो.उप.नि ने.अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना, पोलीस अंमलदार फुलचंद गव्हाणे, चंदा शेडमल्लु, ने. स्थागुशा जालना यांनी केली आहे.