
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव (हवेली)
देहूगाव मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य असे संविधान प्रधान प्रसंगावरील उत्तीत शिल्प साकारणार असून देहूच्या वैभवात आणखीन एक भर पडणार आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनातुन आणि देहूच्या प्रथम नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुमारे वीस ते बावीस लाख रुपये प्रस्तावित खर्च असलेलया या उत्तीत शिल्पासाठी देहूनगर पंचायतीच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या संकल्पाचे उदघाटन बुधवार ( ता.२७ ) रोजी सकाळी या ११ वाजता , देहूच्या प्रथम नगराध्यक्षा स्मिता चव्हाण ,तसेच मान गावचे माजी सरपंच राकेश भरणे आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शैलेंद्र चव्हाण ,संतोष चव्हाण , प्रमोद चव्हाण , चंद्रगुप्त शिरोळे , राजेंद्र लगाडे , अक्षय भोसले , बाप्पू चव्हाण आदी उपस्थित होते.
संविधान प्रधान प्रसंगावरील या उत्तीत शिल्पाची उंची दहा फूट असून त्यामाघे १३ ×१६ ची भिंत , तसेच लॉन , बसण्यास बाकडे , एलएडी लाईट तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव ,अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सविंधनाची प्रत प्रधान भव्य प्रसंग उत्तीत शिल्पातून साकारला जाणार असून त्यामुळे देहूच्या वैभवात आणखीन एक भर पडणार आहे.