
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ३३ केव्ही उपकेंद्र लोहगाव येथील प्रधान यंत्रचालक केशव सोमाजी कांबळे यांची प्रदीर्घ सेवाकरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आज दि.२८ मार्च रोज शुक्रवार ह्या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता शिवकृप्पा मंगल कार्यालय बीलोली रोड नर्सी ता.नायगाव जि.नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश पेंढारकर कार्यकारी अभियंता ,देगलूर विभाग तर प्रमुख पाहूणे म्हणून राजाराम माने ,मुख्य अभियंता ,नांदेड परिमंडळ ,व प्रमुख उपस्थितीत सुधाकर जाधव अधीक्षक अभियंता ,नांदेड परिमंडळ ,विनय घनबहादुर कार्यकारी अभियंता ,नांदेड शहर विभाग, आर.पी.चव्हाण कार्यकारी अभियंता ,नांदेड ग्रामीण विभाग,मंगेश ,बोरगावकर कार्यकारी अभियंता भोकर विभाग ,पी.डब्लू.शीरसागर ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता ,नांदेड शहर उपविभाग क्र.१ ,एस.एन.कांबळे ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम.आय.डी.सी.उपविभाग नांदेड ,व्हि.टी.ढवळे उपकार्यकारी अभियंता धर्माबाद उपविभाग ,हेमंत दिलीप शिंदे ,उपकार्यकारी अभियंता नायगाव उपविभाग यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे तरी या सेवानिवृत्त कार्यक्रमास उपस्थित रहावे आसे आवाहन अक्षय वाकळे सहाय्यक अभियंता नर्सी शाखा यांनी केले आहे.