
दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी -भारत पा. सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनी मराठी वाहिनीमार्फत मुंबई येथे आयोजित ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये संतांच्या वारसांचा सत्कार केला. यावेळी सत्कार करण्यात आलेले संतांचे वारस ह. भ. प. माधव महाराज नामदास, पंढरपूर – संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज, ह. भ. प. रविकांत महाराज वसेकर, अरण – सावता महाराजांचे सतरावे वंशज, ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, देहू – संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज, ह. भ. प. जनार्दन महाराज जगनाडे, सदुंबरे, पुणे – संताजी महाराज जगनाडे यांचे चौदावे वंशज, ह. भ. प. प्रमोद पाठक, शिऊर, वैजापूर – संत बहिणाबाई यांचे तेरावे वंशज , श्री शंकर प्रमोद महाराज महामुनी, पंढरपूर – संत नरहरी सोनार महाराज यांचे एकविसावे वंशज, ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, पैठण – एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या भारतातील पहिल्या रिअंलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महारा्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे.