
दै. चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर प्रतिनिधी – रमजान ईद, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून येथील पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी भोकर शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे….
येणाऱ्या काळातील रमजान ईद, गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण उत्सव शांततेत व हर्ष उल्हासात साजरे व्हावेत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या बाबीची दक्षता म्हणून भोकर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी गस्त व चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसटँड, आदी ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. भोकर शहरात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन सण उत्सव शांततेत साजरे होतात तशी परंपरा ही आहे. ती कायम अबाधित राहावी व येणाऱ्या काळातील सण उत्सव हे शांततेत साजरे व्हावेत, कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गस्त वाढविली त्यासोबतच चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.