
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी (पुणे)
पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र आळंदीत आगमन झाले. दरम्यान त्यांचे फटाक्याची आतषबाजी आणि फुलांच्या हाराने सत्कार करून स्वागत आळंदीत करण्यात आल आहे.
यावेळी देहूफाटा शिवसेना संपर्क कार्यालय येथे शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, सुरेश तापकीर, ज्ञानेश्वर घुंडरे, विशाल तापकीर,अजित काळभोर आदि मान्यवर उपस्थित होते. आळंदीत बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी सभापती डि.डि.भोसले, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, रोहन कुऱ्हाडे उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की मागासवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला अजित पवारांनी विधानसभा उपाध्यक्ष केलं आहे. अजित पवारांच्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत राहिलेलो आहे. हे प्रामाणिक पणाच फळ मिळालं आहे असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून एकदातरी पाहायचं आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील. असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.