
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- तालुक्यातील मुख्य शहरातील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर येथील
‘जागतिक रंगभूमी दिन’ २७ मार्च या दिनाचे औचित्य साधून यशवंत विद्यालय अहमदपूर येथे विविध नाटकात वापरण्यात येणाऱ्या प्राणी पक्षी कार्टून्स इत्यादी चेहऱ्यावर लावण्यासाठीचे विद्यार्थ्यांने विविध आकाराचे मुखवटे साकारले.
पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. प्रतिवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा केला जातो.आपल्या संस्कृतीत – सामाजिक आणि धार्मिक उत्सवांमध्ये आणि नाट्यप्रयोगांमध्ये – मुखवटे घालण्याचा मोठा इतिहास आहे. शालेय स्नेह संमेलनात मुलांसाठी, मुखवटे वापरुन मजेदार आनंद लुटत असत.बऱ्याच वेळा नाट्यीकरण करत असताना आपल्याला काही प्राण्यांचे ,पक्ष्यांचे मुखवटे लागत असतात.नाटकांच्या सादरीकरणादरम्यान, मुखवटे प्रामुख्याने पात्रांत राग, दुःख आणि आनंद व्यक्त करण्यासाठी वापरले जातात.अशा मुखवटे पासून नाटकात जिवंत दर्शन घडते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, NEP-2020 मूल्यसंसस्कार किंवा आनंद हा केवळ पाठ्यपुस्तके वाचून निर्माण होत नाही. तर ती कृतीमधून,अनुभवांतून, खेळांतून,कलेतून,पर्यटनांतून, प्रात्यक्षिकांतून,स्वनिर्मितीमधून आणि बौद्धिक खेळांतून हे साधता येते. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय आनंददायी शनिवार ‘दप्तराविना शाळा’ हा विचार मांडला गेला.म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविला जातो.
सदरील उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना टाकाऊ पुठ्ठ्यापासून सुरेख मुखवटे तयार साकारण्यासाठी कला शिक्षक महादेव खळुरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.लहान मोठे आकाराचे मुखवटा कलाकृतीतून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांने घेतला.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक व अभिनंदन केले.