
धनंजय मुंडेंचं नवीन कांड बाहेर काढत दमानियांचे गौप्यस्फोट…
धनंजय मुंडे पाच वर्षापूर्वी तेजस ठक्कर नावाच्या माणसाला सोबत घेऊन आले होते. त्यावेळी त्यांच्याकडं कागदांचा मोठा गठ्ठा होता. त्यामधून मी पंकजा मुंडे यांचा विषय मांडावा असा आग्रह त्यांनी केला.
मात्र, मी धनंजय मुंडे यांना सांगितल की मी असं कुणी काही दिलेल्या कागदांवर मी काम करत नाही. दरम्यान, मी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या अनेक प्रकरणांवर भाष्य केलं त्यावेळी एका टीव्ही चर्चेमध्ये राजेंद्र घनवट यांचं नाव मी घेतलं. ते नाव घेतल्यानंतर अनेक शेतकरी माझ्याकडं आले. त्यांनी सांगितल की या घनवट या व्यक्तीने आमचे मोठा छळ केला आहे. हाच राजेंद्र घनवट धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा घनवट यांच्यामुळं अडचणीत येण्याची शक्यता आहे.