
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, बहुजनप्रतिपालक, अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवप्रेमी, मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. यानंतर उपस्थितांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे स्वराज्यासाठी दिलेले योगदान आठवले. यावेळी विविध वक्त्यांनी शिवाजी महाराजांचे आदर्श आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचा उल्लेख करत तरुणांनी त्यांच्या विचारांवर चालावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये चंद्रशेखर मोहिते सर, विजयकुमार चवळे, शिवशंकर पाटील, प्रशांत भाऊ जगताप, अड. भाऊसाहेब जांभळे, अड. कनिष्क शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी, धनराज जाधव, नारायण भोसले, विजय बामणीकर, सचिन पाटील, बालाजी व्यंकोने, सतीश पाटील मानकीकर, पंकज कालानी, बालाजी नादरगे, वाडकर गुणवंत, शिवाजी मोहिते, ऋषिकेश मुळे, अमर कांबळे दावनगाव, शिवाजी पकोळे, डी. एस. बिरादार सर आणि इतर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषात महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.
शिवचरित्राने प्रेरणा घेण्याचा संकल्प
या अभिवादन सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला. महाराजांचे ध्येय आणि तत्वज्ञान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
या अभिवादन सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. या कार्यक्रमाने शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला आणि महाराजांबद्दलची निष्ठा आणखी दृढ झाली.